Posts

Showing posts from June, 2024

ती..

 ती यायची मला भेटायला खूप बोलायचो आम्ही कधी तासंतास कधी थोडाच वेळ कधी कधी आल्या पावलीच निघून जायची ती.. मग हळू हळू तिचं येणं कमी झालं, यायची आणि हळूच निघून जायची मी तिला थांब म्हणाले, पण ती मात्र कळून नं कळल्यासारखे करायची निघून जायची.. आणि एक दिवस ती येते म्हणाली मी अगदी आतुरतेने तीची वाट बघत होती पण ती मात्र आलीच नाही.. तो दिवस शेवटचा, त्या नंतर ती कुठे गेली  काहीच ठाऊक नाही.. खूप बोलायचो आम्ही... ती यायची मला भेटायला.. ती माझी कविता... - कस्तुरी दाणी