मी बोलतेय..हो हो मीच.. माझं नाव? ठाऊक नाही.. गाव? ठाऊक नाही.. माझं घर? मी राहत होती अश्या एका ठिकाणी जिकडे माझ्याच सारखी अनेक मुलं होती.. ज्यांना नाव,गाव, आई, बाबा...काही ही ठाऊक नाही.. अनाथाश्रम... हो, मी अनाथ आहे. मी अगदी लहान असल्यापासून इथेच रहायचे. इथल्या मावशी, दादा यांनीच माझा सांभाळ केलांय.. आई, बाबा, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, मामा..कुणी कुणी नाही.. आता तुम्ही म्हणाल भीती नाही वाटत? भीती? ती काय असते? बालपणापासून इथेच रहायचे,आजूबाजूला अनेक मुलं असायची, लहान, मोठी..पण मनातून मात्र एकटीच..तशी सवयच झालीय आता.. ना आई,बाबा ना भाऊ बहीण.. इथे सगळीच मुलं तशी.. आमचं जीवन असंच असतं.. ज्या क्षणी आई-वडिलांच्या मनात येतं की मूल नकोय त्याक्षणी आमची रवानगी त्या घरातून होते.. काही बाबतीत नियती याहून क्रूर असते.. आई वडील प्राण गमावतात.. कुठलंही कारण असो..पण भोग मात्र आमच्याच वाट्याला. बालपण म्हणजे आईच्या कुशीत दडून स्वप्नांच्या दुनियेत रमणे. बालपण हे निरागस, स्वप्नवत असावं.. आई वडिलांचे प्रेम, संस्कार आणि सुखद अनुभवांनी समृद्ध असावं. आई वडिलांच्या आधाराचं एक सुरक्षित ...
Comments
Post a Comment